नितीन गडकरींनी घेतली सलमान खानची भेट
मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पाठोपाठ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत “संपर्क से समर्थन’ हे अभियान राबविले. या अभियानांतर्गत त्यांनी आज अभिनेता सलमान खान याची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी गडकरी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामगिरीची माहिती दिली.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. यापार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी वलयंकित व्यक्तींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी उद्योगपती रतन टाटा, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली होती. आज गडकरींनी वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथील सलमानच्या घरी जाऊन सलामान तसेच त्याचे वडिल सलीम खान यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरींनी येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांची भेट घेतली. नितीन गडकरी हे रात्री उशीरा अभिनेता नाना पाटेकरची भेट घेणार आहेत.