breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी-दापोडी बीआरटी चाचणी अहवाल आज न्यायालयात सादर होणार

पिंपरी – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये बुधवारी (दि. 25) बसची चाचणी घेण्यात आली. यामध्ये बस थांब्याचे दरवाजे उघडण्यातील त्रुटी आणि सिग्नल प्रवण भागातील वाहनांची ये-जा या अडथळ्यांचा सामना करत ही चाचणी यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज गुरुवारी महापालिका प्रशासनाकडून उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.

 

निगडी-दापोडी बीआरटी मार्गाचे वादग्रस्त प्रकरण उच्च न्यायालयात असल्याने न्यायालयात सुनावणीदरम्यान चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते. बुधवारी (दि. 25) सकाळी साडेअकरा वाजता महापालिका मुख्यालयाजवळील बसथांब्यावरून चाचणीला सुरुवात झाली. याचिकाकर्ते अॅड. हिम्मतराव जाधव, बीआरटीएसचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, उपअभियंता विजय भोजने, बीआरटीएस व्यवस्थापक सुनील गवळी, पिंपरी महापालिकेचे एकनाथ पाटील, दीपक पाटील, उपअभियंता संजय साळी, निगडी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरिक्षक संजय जाधव, भोसरी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पाटील, चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यू. एन. लोंढे आदींच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.

 

गेल्यावेळी याच मार्गावर बीआरटी बसची चाचणी घेतली होती. त्यावेळी बीआरटीएस बसथांब्यांचे दरवाजे उघडण्याची तांत्रिक अडचण जाणवली होती. त्यामध्ये आयटआयटी पवईकडून मिळालेल्या सूचनेनुसार सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी पुन्हा या मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आरएफआयडी टॅग न जुळल्याने काही बसथांब्यांचे दरवाजे उघडले नाहीत. मात्र, चालकाने बस मागे-पुढे घेतल्याने हा टॅग जुळल्याने हे दरवाजे उघडले. याशिवाय पादचा-यांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या सिग्नलचीदेखील यावेळी चाचणी घेण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button