breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीपर्यंत मेट्रोच्या विकास आराखड्याची नागरिकांना प्रतिक्षा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठीचा विकास आराखडा (डीपीआर) अहवाल तयार झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून दिली जाते. मात्र, हा आराखडा प्रत्यक्षात सादर करण्यास एवढा विलंब का लागत आहे. मेट्रोचा हा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

यासंदर्भात चिखले यांनी महापौर राहूल जाधव यांच्याकडे विचारणा केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पत्र दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या मागणीनुसार मेट्रो अंतिमतः निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत होण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम मेट्रो व्यवस्थापनाने पूर्ण केल्याची माहिती कळते. पालिकेच्या नगररचना विभागातील तज्ञ अधिका-यांच्या सूचनेनुसार मेट्रोकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडून तो का सादर केला जात नाही. त्यामध्ये त्रुटी असल्यास किंवा तो आराखडा कसा आहे, हे समजून घेण्याची नागरिकांना उत्सुकता आहे. तरी, मेट्रोचा आराखडा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, अशी मागणी गटनेते चिखले यांनी महापौर जाधव यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button