breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सासरच्या जाचाला कंटाळून एका २६ वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निगडी यमुनानगर येथील सेक्टर २१ येथे घडली.

याप्रकरणी मृत महिलेचा भाऊ मनिषकुमार लवकुश केसरवानी (वय २३, रा. बरौत, टोलारोड, इलाहाबाद, उत्तरप्रदेश) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती रुपेश अशोक केसरवानी (वय ३६), दिर रितेश अशोक केसरवानी (वय ३०) आणि सासरे अशोक केसरवानी (वय ५५, सर्व रा. सेक्टर २१, यमुनानगर, निगडी) या तिघांविरोधात आत्महत्या करण्यात प्रवृत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी झाली म्हणून तसेच व्यवसाय करण्यासाठी, मुलीच्या शाळेसाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये असा केसरवानी कुटुंबीयांनी महिलेकडे वारंवार तगादा लावला होता. तसेच सासरे अशोक यांनी तिचा विनयभंग केला. या छळाला कंटाळून विवाहितेने सोमवारी (दि.११) निगडी येथील राहत्या घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या भावाने गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अरदवाढ तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button