breaking-newsपिंपरी / चिंचवड

निगडीत नवमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी

  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, पाकिस्तानचा केला तीव्र निषेध

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – निगडी येथील नवमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत पुलवामा येथे घडलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प येथे “हायटेक शिवसृष्टी” उभारण्याच्या मागणीला यश आल्यामुळे भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

शहरात सगळीकडे आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असुन छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तळागाळातील सर्वांना माहिती व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच, पुलवामा येथे घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत पाकिस्तानमध्ये घुसुन आतंकवादी मारण्यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत. “महाराजांनी ज्या प्रकारे शत्रुला पळताभुई करत अनेक गडकिल्ले जिंकुन स्वराज्य स्थापन केले. सर्वसामान्य प्रजेला घेऊन सुराज्य प्रस्तापित केले. त्याच पध्दतीने आपणही आदर्श घेतला पाहिजे” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे शिवाजी साळवे, भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे, मंडळाचे अध्यक्ष अरुण जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत गायकवाड, सोमाजी बोडके, विलास बुचुडे, लहू नाटेकर यांच्यासह अनेक शिवप्रेमी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button