breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीतील मॉडर्न शैक्षणिक संकुलास आदर्श शाळेचा पुरस्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – यमुनानगर निगडी येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलास महेशदादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा  ‘आदर्श शाळा ‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे,दत्ता गायकवाड, नगरसेवक कुंदन गायकवाड,नगरसेविका साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, दिनेश यादव, संतोष मोरे,पांडुरंग भालेकर, जितेंद्र मेहता, सतीश गवळी, शरद इनामदार उपस्थित होते.

यावेळी शहरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी आयोजित शिक्षक मेळाव्यात शिक्षकांच्या आणि संस्थांच्या अनेक समस्यांवर चर्चा झाली. शिक्षकांच्या सर्व समस्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन महेश लांडगे यांनी दिले. यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले आपल्या शहराची ओळख औद्योगिक नगरी असून याचबरोबर शैक्षणिक नगरी म्हणून नावलौकिक वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. यासाठी महापालिकेकडून सर्वोतोपरी मदत शिक्षकांना देण्यात येईल असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button