breaking-newsआंतरराष्टीयराष्ट्रिय

नासाच्या ‘टेस’ मोहिमेत नव्या ग्रहाचा शोध

नासाने अलिकडेच सौरमालेबाहेर एक ग्रह शोधून काढला असून तो ५३ प्रकाशवर्षे दूर असलेल्या बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सव्‍‌र्हे सॅटेलाइट म्हणजे टेस अंतर्गत एप्रिलपासून शोधण्यात आलेला हा तिसरा ग्रह आहे. या ग्रहाचे नाव एचडी २१७४९ बी असे आहे. तो बटू ताऱ्याभोवती फिरत असून हा तारा ५३ प्रकाशवर्षे दूर आहे.

ग्रहाचा कक्षा काळ हा आतापर्यंत शोधलेल्या तीन ग्रहात सर्वाधिक आहे. एचडी २१७४९ बी ग्रह हा ताऱ्याभोवती ३६ दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. आधीच्या पाय मेन्सा बी या महापृथ्वी मानल्या जाणाऱ्या ग्रहाचा प्रदक्षिणा काळ ६.३ दिवस असून एलएचएस ३८४४ बी या खडकाळ ग्रहाचा प्रदक्षिणा काळ ११ तासांचा आहे.

सर्व तीन ग्रह टेस निरीक्षणांच्या पहिल्या तीन महिन्यांत शोधले आङेत. नव्या ग्रहावरचे तपमान ३०० अंश फॅरनहीट असण्याची शक्यता असून तो तुलनेने थंड आहे. सूर्याइतक्या तप्त ताऱ्याच्या जवळ असूनही त्याचे हे तपमान तुलनेने कमी मानले जाते.

या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांपैकी तो शीत ग्रह असल्याचे अमेरिकेतील एमआयटीच्या संशोधक डायना ड्रॅगोमीर यांनी सांगितले.

उष्ण ग्रहांच्या वातावरणाबाबत बरीच माहिती असली, तरी ताऱ्यापासून दूर अंतरावरून फिरणाऱ्या थंड ग्रहांच्या वातावरणाची माहिती अजून कमी आहेत.

आता सापडलेल्या ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास त्यामुळे महत्त्वाचा असून हा ग्रह पृथ्वीपेक्षा तिप्पट मोठा आहे. त्यामुळे तो उप नेपच्यून गटातील आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या तीन पट आहे.  हा ग्रह खडकाळ असण्याची शक्यता कमी आहे. तेथे वायू जास्त असून त्याचे वातावरण नेपच्यून किंवा युरेनसपेक्षा घनदाट आहे. त्या ग्रहांप्रमाणेच या ग्रहावर वायू अधिक आहे.

अजून एका ग्रहाचे अस्तित्व जाणवले असून त्याची निश्चिती झालेली नाही. हा ग्रह ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा ७.८ दिवसांत पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध निश्चित झाला, तर तो टेसने शोधलेला पृथ्वीच्या आकाराचा पहिला ग्रह असेल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button