breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाशिक फाट्याजवळील मेट्रोच्या अपघातास ‘पायलिंग रिंग’ चालकाला धरलं दोषी

कंत्राटदाराला ताकीद देवून ठोकला दंड

पिंपरी – नाशिक फाटा येथे झालेला क्रेनचा अपघात अपवादात्मक असल्याचा दावा करून त्यासाठी ‘पायलिंग रिंग’च्या चालकाला जबाबदार धरण्यात आले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) या चालकाची सेवा संपुष्टात आणली असून, संबंधित कंत्राटदाराला ताकीद देऊन दंड ठोठावला आहे. अपघातानंतर ‘महामेट्रो’ने सुरक्षेच्या दृष्टीने ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) निश्चित केली असून, त्रयस्थ संस्थेतर्फे सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नाशिक फाट्याजवळ मेट्रोच्या खांबांचा पाया खोदण्यासाठी कार्यरत ‘पायलिंग रिंग’ अचानक कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी मेट्रोच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात येत आहे. या अपघाताची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश ‘महामेट्रो’ प्रशासनाने दिले होते. महामेट्रोचे प्रकल्प संचालक आणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यांच्या समितीने चौकशी पूर्ण केली असून, संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. पायलिंग रिंगमार्फत आतापर्यंत एक हजार ‘पाइल’ पूर्ण करण्यात आले आहे. या दरम्यान कधीच कोणताही अपघात घडला नाही. नाशिक फाट्याजवळील अपघात अपवादात्मक परिस्थितीमुळे उद्भवल्याचे स्पष्टीकरण महामेट्रोने दिले आहे. संबंधित मशिनच्या चालकाला काढण्यात आले असून, कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आला आहे.

भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी महामेट्रोने नव्याने ‘एसओपी’ निश्चित केली आहे. तसेच, सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची सातत्याने तपासणी करण्यासाठी आणि त्यात समोर येणाऱ्या त्रुटी दूर करण्याकरिता त्रयस्थ संस्थेतर्फे सुरक्षा ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button