breaking-newsपुणे

नालेसफाईचा नगरसेवकांनाही जाणार अहवाल

  • स्थायी समितीचे प्रशासनाला आदेश : कामांची माहिती होत नसल्याची होती तक्रार

पुणे – पावसाळा पूर्व करण्यात येत असलेल्या नाले सफाईच्या कामाचे फोटो संबंधित प्रभागातील नगरसेवकांना पाठविण्यात यावेत असे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीने प्रशासनास दिले आहेत. स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरातील पावसाळा पूर्व कामाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी काही समिती सदस्यांनी ही कामे गुपचूप केली जातात, नगरसेवकांना त्याबाबत काहीच कल्पना नसते, तसेच एखाद्या नाल्याची सफाई झाली का-नाही हे नगरसेवकांनाही माहीत नसते. याबाबत सर्वच पक्षाच्या नगरसेवकांकडून महापालिकेच्या पदाधिकऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. तसेच प्रशासन नाल्याची सफाई पूर्ण होत असल्याचे सांगत असतानाच नगरसेवक मात्र, अद्यापही कामच सुरू झाले नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नाले सफाईची नेमकी सद्यस्थिती काय हे लक्षात येत नाही. त्यामुळे या पुढे प्रशासनाने ज्या भागातील नाल्याची सफाई केलेली असेल, त्या भागातील स्थानिक नगरसेवकांना काम सुरू कारण्यापूर्वीचे आणि काम केल्यानंतरचे फोटो स्थानिक नगरसेवकांना पाठवावेत तसेच सुरू असलेल्या कामाची कल्पनाही त्यांना द्यावी असे आदेश देण्यात आले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त आयुक्तांनीही मागविला अहवाल
महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनीही शहरातील नाले सफाईच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य खात्यास दिले आहेत. मात्र, अतिरिक्त आयुक्तांनी आदेश देऊन आठवडा लोटला तरी अद्याप एकाही क्षेत्रीय कार्यालयाकडून हा अहवाल पाठविण्यात आलेला नसल्याचे समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button