breaking-newsमनोरंजन

नायिकांची पावले निर्मिती क्षेत्राकडे

अलीकडील काळात नव्या पिढीतील महत्त्वाकांक्षी, साहसी आणि कृतीशील अभिनेत्री देखील जुन्या नट्यांप्रमाणेच निर्मिती क्षेत्रात नशिब आजमवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनुष्का शर्माने खूपच कमी काळात अभिनेत्री ते निर्माता होण्याचे धाडसी पाऊल उचलले आणि ते यशस्वी करून दाखवले. “एन.एच 10′ च्या निर्मितीचा भार तिने उचलला. अभिनेत्री म्हणून फारशी यशस्वी न ठरलेली दिया मिर्झाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाने त्यांचा बॅडपॅच दूर झाला असे काही अंशाने म्हणता येईल. अभिनयापासून दूर गेलेली शिल्पा शेट्टीने देखील “ढिस्क्‍याऊ’पासून चित्रपट निर्मितीत नशिब आजमावले. दुर्देवाने निर्मिती क्षेत्रातही शिल्पा शेट्टीला फार मोठी कामगिरी करता आला नाही. ढिस्क्‍याहूं बॉक्‍स ऑफीसवर पार आपटला. आपल्या करियरला आणखी उंची मिळावी यासाठी प्रिती झिंटाने चित्रपट निर्माती होण्याचा निर्णय घेतला आणि इश्‍क इन पॅरिसची निर्मिती केली. या चित्रपटात तिने अभिनयही केला, परंतु हा चित्रपट तिकीटबारीवर कोसळला. या चित्रपटाच्या मदतीने प्रितीचे करियर सावरले गेले नाही, मात्र निर्माती म्हणून चित्रपट उद्योगात तिला नवीन ओळख मिळाली. “कहो ना प्यार है’ चित्रपटातून यशस्वी पदार्पण करणारी अमिषा पटेलने दुसरी इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला. देसी मॅजिक चित्रपटातून ती निर्माती म्हणून समोर येत आहे.

चित्रांगदा सिंहनेही काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या सुरमा चित्रपटातून निमिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. बच्चन घराण्याची सून ऐश्‍वर्या रायनेही “दिल का रिश्‍ता’ चित्रपटापासून निर्मितीत वेगळ्या करियरची संधी साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती यशाच्या शिखरावर होती. याखेरीज जुही चालवला, प्रियांका चोप्रा यांनीही निर्मितीच्या प्रांतात आपले नशीब आजमावले. दीपिका पदुकोनदेखील आपल्या करियरला वेगळे वळण देण्यासाठी निर्मितीच्या क्षेत्रात येण्याच्या तयारीत आहे. चांगले, दर्जेदार आणि सामाजिक विषयावर चित्रपटांची निर्मिती व्हावी अशी तिची इच्छा आहे. लवकरच ती चित्रपट निर्मितीची प्रक्रिया देखील सुरू करू शकते. अभिनेत्रींचा निर्मिती क्षेत्राकडे असणारा कल पाहता आगामी काळात चित्रपट निर्मिती क्षेत्रात सौंदर्य आणि रचनात्मकता याचा चांगला ताळमेळ पाहवयास मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button