breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – एकनाथ पवार

  • फुलेनगर येथे नागरी सुविधा केंद्र सुरू
  • पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी – नागरिकांना घराजवळ पालिकेच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे पालिकेतील हेलपाटे कमी व्हावेत. त्यांना सर्व प्रकारचे दाखले सहजरित्या उपलब्ध व्हावेत. त्यांची पालिकेशी निगडीत कामे झटपट व्हावीत, यासाठी नागरी सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे, असे प्रतिपादन महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.

 

प्रभाग क्रमांक 11 येथील महात्मा फुलेनगर येथे ऐश्वर्या एंटरप्रायझेस नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन शनिवारी (दि. 22) पक्षनेते पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका योगिता नागरगोजे, ऐश्वर्या एंटरप्रायझेसचे पोपट हजारे, महादेव कवितके, विकास साखरे, सचिन नागणे, अश्विनी शिंदे, बाबा देसाई, संतोष ठाकूर, शंकर दोनतडे, अविष्कार हजारे, दादासाहेब थोरात, अरूण बोरगे, जोत्स्ना पाटील, अर्चना पवार, बेबी सुतार, राणी थोरात, सुनंदा बोरगे, नागेश शेट्टी, कविता करदास, बाळासाहेब गंगावणे आदी उपस्थित होते.

 

पक्षनेते पवार म्हणाले, महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना आणि महिला व बालकल्याण योजनेंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, शहराची वाढत्या लोकसंख्येनुसार लाभार्थ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने अशा नागरी सुविधा केंद्राची खासगी तत्वावर उभारणी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लाभार्थ्याला पालिकेच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी या नागरी सुविधा केंद्राचा निश्चित रुपाने फायदा होणार आहे.

 

या नागरी सुविधा केंद्रामध्ये जन्म मृत्यू दाखला, मिळकत हस्तांतर, विवाह नोंदणी, वारस नोंद, अग्निशामक परवानगी, नवीन नळ कनेक्शन, रेशन कार्ड, नॉन क्रिमिलीयर, डोमिसाईल दाखले, जातीचे दाखले, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, ऑनलाईन पासपोर्ट, उद्योग आधार, फुड विक्री परवाना, पोलीस व्हेरिफिकेशन यासह विविध प्रकारचे दाखले नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button