breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची आता “फोन ऑफ फ्रेण्ड” संकल्पना

  • पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची माहिती

पिंपरी – शहरात घडलेल्या अनुचित घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलीस कर्मचा-यांच्या वेगवेगळी पथके तयार केली जाणार आहेत. एखाद्या भागात गुन्हेगारी घटना घडल्यास नागरिकांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. अवघ्या काही वेळातच त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक हजर राहील. त्यामुळे गुन्हेगारी कृत्याला आळा बसून पोलिसांना माहिती कळविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना प्राप्त होईल. त्यामुळेच “फोन ऑफ फ्रेण्ड” ही संकल्पना राबविली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. तरीही, आहे त्या कर्मचा-यांना एकत्रीत करून त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात येणार आहेत. त्यांना भेदभाव न करता कामाचे वाटप केले जाणार आहे. त्यातच पुढच्या आठवड्यात पोलीस आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातल्या सर्व सोसायट्यांचा आढावा घेतला जाणार आहे. सोसायट्यांमध्ये तक्रार पेटीची व्यवस्था केली जाणार आहे. अलिकडे सोशल माध्यमात गोपनियता राहिली नसल्यामुळे नागरिक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे सोसाट्यांमधील तक्रार पेटीत नागरिकांना निनावी तक्रार देखील टाकता येणार आहे. त्याचा निपटारा पोलिसांतर्फे केला जाणार आहे, असेही आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले.

आयुक्तालय निकतेच सुरू झाल्याने 100 क्रमांक हा अद्याप कार्यान्वीत नसल्याने संपर्क करण्यासाठी 27450888 आणि 27450666 हे कंट्रोल रुमचे क्रमांक आहेत. नागरिकांना तक्रार देण्यासाठी 100 क्रमांकाऐवजी या क्रमांकाचा उपयोग होणार आहे. पुढील काळात वाहतुकीला शिस्त लावली जाणार आहे. त्यासाठी 500 जॅमर तयार आहेत. दुतर्फा पार्किंग कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यातच सिग्नल तोडणा-याला अंकुष घालण्यात येणार आहे. असेही आयुक्त पद्मनाभन म्हणाले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button