breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांना भेडसावणा-या प्रश्नांवर पीएमपीएमएलने उपाययोजना कराव्यात – राहूल जाधव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन तसेच पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक आज सोमवारी (दि. 15) चिंचवड येथील अॅटो क्लस्टर येथे पार पडली. पीएमपीएमएलशी संबंधित असंख्य प्रश्नांवर पदाधिकारी, अधिका-यांनी चर्चा केली. नागरिकांना भेडसावणा-या प्रश्नांवर वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना देखील महापौर राहूल जाधव यांनी प्रशासनाला दिल्या.

या बैठकीला महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हार्डीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, गटनेते राहूल कलाटे, सचिन चिखले, कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, पीएमपीच्या व्यवस्थापकीय अध्यक्षा नयना गुंडे, पीएमपीचे अन्य अधिकारी, कर्मचारी आणि विविध पक्षांचे नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

पीएमपीएमएलचे 178 कर्मचारी महापालिकेकडे कार्यरत होते. मात्र, पीएमपीएमएलचे तत्कालीन व्यवस्थापकीय अध्यक्ष तुकाराम मुंडे यांच्या मागणीनंतर या कर्मचा-यांना पीएमपीएमएलकडे वर्ग केले. मात्र, या कर्मचा-यांना पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबतचा निर्णय येत्या 20 ऑक्टोबरच्या आत घेण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी केल्या.

ब-याच कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात जावे लागते. त्यांना त्यांच्या राहत्या घरापासून जवळ असलेल्या परिसरातील डेपोत बदली करण्यात यावी. बसेसची संख्या वाढविण्यात यावी, बंद केलेले मार्ग पुन्हा सुरू करावेत, नवीन मार्ग सुरू करावेत, आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, देखभाल दुरूस्तीबाबत सक्षम यंत्रणा उभी करावी, डेपो सीएनजी व्यवस्थेसह अद्ययावत करावा, पीसीएमटीच्या कर्मचा-यांना दुजाभावाची वागणूक दिली जाऊ नये, आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button