breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरवस्तीच्या बचतगट अर्थसहाय्य योजनेंच्या अटी शिथिल

महिला व बालकल्याण समितीचा निर्णय 

पिंपरी – बॅंकेत नियमित बचत होत नसल्याच्या कारणास्तव अनेक बचतगटांना महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून अनूदानापासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे त्या योजनेच्या अटी व शर्थीत बदल करण्याचा निर्णय आज (मंगळवार) महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडून महिला व बालकल्याण योजनेंतर्गत दीड आणि दहा वर्षे पुर्ण झालेल्या बचत गटांना अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेंच्या अटी व शर्थीनूसार बचतगट नियमित असणे आवश्यक आहे. परंतू, अपरिहार्य कारणास्तव काही महिन्यामध्ये मासिक बचत बॅंकेत जमा होत नसली तरी बचतगट सुरळीत चालू असतो.  त्यामुळे बचत नियमित जमा होत नाही म्हणून महापालिकेकडून मिळणारे अनुदानापासून अनेक बचत गटांना वंचित रहावे लागत होते. त्यामुळे महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने योजनेत दुरुस्ती करण्याचा ठराव करुन त्याला मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button