breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘नाईट शूट’ करण्याची ऑफर फाेटाेग्राफरला पडली महागात

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  कॅमेऱ्याने ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने फोटोग्राफर व त्याच्या मित्राला निर्जनस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण करुन एक लाख रुपयांचा ऐवज चौघांनी लंपास केला. ही घटना दिघीतील काळजेवाडी रोड व आळंदी सेवा रस्ता या दरम्यान गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.

सुरज अनिल कांबळे (वय २१, रा. पर्वती निवास, भोसरी) व त्यांचा मित्र तेजस यांना मारहाण झाली. याप्रकरणी चार आनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी कांबळे हे फोटोग्राफर आहेत. आरोपींनी ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने कांबळे व त्यांच्या मित्राला कॅमेरयासहित बोलावून घेतले. त्यानंतर ‘रो हाऊस’वर चला असे सांगत मिलिटरी एरिया मधील निर्जनस्थळी दोघांना घेवून गेले. त्याठिकाणी गेल्यानंतर डोळयात मिरची पूड टाकून सुरज कांबळे व तेजस यांना दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील कॅमेरे, मोबाईल फोन व रोकड असा एकूण ९९ हजार ४२० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button