breaking-newsमहाराष्ट्र

नवरात्रौत्सवात अंबाबाईचे लाईव्ह दर्शन

कोल्हापूर –  नवरात्रौत्सवादरम्यान श्री अंबाबाई  देवीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल होतात. अशावेळी स्थानिक भाविकांना देवीचे दर्शन दुर्लभ होते. यासाठी नवरात्रौत्सव काळात शहरातील प्रमुख चौकात एलईडी स्क्रीन बसवून स्थानिक भक्तांना देवीच्या लाईव्ह दर्शनाचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

नवरात्रौत्सवानिमित्त मंदिरातील तयारीला वेग आला असून, भाविकांसाठी देवस्थान समितीकडून अनेक उपयुक्त निर्णय घेण्यात आल्याचेही जाधव यांनी सांगितले. देवस्थान समितीची नवरात्रौत्सवाच्या तयारीची बैठक झाली. यावेळी वैशाली क्षीरसागर, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, अभियंता सुदेश देशपांडे आदी उपस्थित होते..

परंपरेप्रमाणे नवरात्रौच्या नऊ दिवसांत श्री पूजकांकडून देवीची विविध रुपात सालंकृत पूजा बांधली जाणार आहे. 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या नवरात्रौत्सवासाठी मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले आहे. मंदिर स्वच्छतेच्या कामाने गती घेतली आहे. छताची स्वच्छता सुरू आहे. शिखरांचे रंगकाम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिर परिसरातील वीज जोडणी, सीसीटीव्ही यांची तपासणी करून ती दुरुस्तीचे काम सुरू आहे. दि. 4 पासून देवस्थानचे पदाधिकारी, सुरक्षारक्षक पोलिस बंदोबस्तात इन कॅमेरा देवीच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाणार आहे. देवस्थान समिती अध्यक्षांच्या हस्ते मंदिरातील घटस्थापना होणार आहे. मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शन मंडप उभारणी सुरू झाली आहे.

नऊ दिवस सोन्याच्या पालखीतून देवीचा पालखी सोहळा होईल.  दि. 14 रोजी ललिता पंचमीनिमित्त त्र्यंबोली देवी दर्शनाला रवाना होणार आहे. दि. 17 रोजी देवीचा जागर असल्याने रात्री देवीचे वाहन नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. दि. 18 रोजी पालखी सीमोल्लंघनासाठी बाहेर पडेल. या भाविकांना, सेवकांना नवरात्रौत्सवात सेवा द्यायची आहे, त्यांनी समिती कार्यालयात वैयक्तिक संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. येताना फोटो, आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. सेवेसाठी येणार्‍या भाविकांना मंदिर व शहरात विविध ठिकाणी सेवा देता येणार आहे. सेवा देउ इच्छिणार्‍यांनी देवस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button