breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण, ‘सनातन’चे वकील सीबीआयच्या जाळ्यात

मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकरांनासह विक्रम भावेला काल मुंबईत सीबीआयने अटक आली. आज या दोघांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील जामिनावर बाहेर असलेले संशयित आरोपी समीर कुलकर्नीही कोर्ट परिसरात हजर आहे.  संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत. विक्रम भावे यांचे मालेगाव स्फोटाशी कनेक्शन असल्याचे समजते.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे, असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोलकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्य डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button