breaking-newsराष्ट्रिय

नया रायपूर स्मार्ट सिटीच्या नियंत्रित केंद्राचे उद्‌घाटन

भिलाइ (छत्तीसगड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नया रायपूर स्मार्ट सिटीच्या एकीकृत नियंत्रण केंद्राचे उद्‌घाटन केले. नया रायपूरचे एकीकृत नियंत्रण केंद्र हे देशातले कार्यान्वित होणारे दहावे स्मार्ट सिटी केंद्र ठरले आहे. अहमदाबाद, वडोदरा, सुरत, पुणे, नागपूर, राजकोट, विशाखापट्टणम्‌, भोपाळ आणि काकीनाडा या नऊ शहरातील एकीकृत नियंत्रण केंद्रे याआधीच कार्यान्वित झाली आहेत.

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत निवड झालेले नया रायपूर ही छत्तीसगडमधील तिसरी स्मार्ट सिटी आहे. नया रायपूर ही देशातली पहिली स्मार्ट ग्रीनफिल्ड सिटीही आहे. देशातली डिजिटली सेसेबल पहिली स्मार्ट सिटी ठरण्याचा मानही नया रायपूरकडे जात आहे. नया रायपूर माहिती तंत्रज्ञान, वित्त, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण यासारख्या क्षेत्रात सेवा पुरवणारे केंद्र ठरावे अशा दिशेने काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button