breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन जनजागृती

पिंपरी – आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त रेल्वे रुळावरुन धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला.

चिंचवड रेल्वे स्थानकावर एक्‍सप्रेस आणि लोकल ट्रेन थांबल्यानंतर पादचारी पुलाचा वापर न करता बरेच प्रवासी फलाट क्रमांक चारवरून धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडत होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कुटूंबासह लोहमार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त होते. त्या प्रवाशांना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते थांबवत होते. तसेच, त्यांना गुलाबाचे फुल देऊन अशा पद्धतीने लोहमार्ग ओलांडणे धोक्‍याचे असल्याचे समजावुन सांगत होते. त्याशिवाय, नियमानुसार पादचारी पुलाने येणाऱ्या प्रवाशांचे प्रतिष्ठानतर्फे स्वागत करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्याची सोय करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, रंजना जोशी, नम्रता बांदल, श्‍वेता गायकवाड, विनोद सुर्वे, तृषाल जाधव, नितीन इंगवले, सुदर्शन दरेकर, सुधीर दरेकर, टी.प्रभाकरन, महेंद्र जगताप, बाळासाहेब शिखरे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button