breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
धुक्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
दाट धुक्यांचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या बदलापूर, खोपोली आणि कर्जत मार्गावरील लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत. त्यामुळे पहाटे कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक १० मिनिट उशिराने सुरु आहे.
आज नियोजित वेळेत कार्यालय गाठता येणार नसल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. एरवी सुद्धा कधी सिग्नलमध्ये बिघाड, रेल्वे रुळाला तडे अशा कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत असते.