breaking-newsमहाराष्ट्र

धावत्या एसटीचे चाक निखळून पडले

अहमदनगर : धावत्या एसटीचे चाक निखळून पडले परंतु, यातून मोठी दुर्घटना होता होता टळली. अहमदनगर जिल्ह्यात सकाळी सहा वाजता श्रीगोंद्यावरुन दौंडला जाताना सांगवी गावाजवळ एसटीचे चाक निखळले. वाहकाच्या बाजूचे चाक गळून पडले. तर दुसरे चाक अडकलेलेले होते.

श्रीगोंदा आगाराच्या या बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी होते. जुनाट नट निखळल्याने चाक गळून पडले. काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या टँकर चालकाने चाक गळून पडल्याची माहिती दिली. मागच्या एकाच चाकावर एसटी जवळपास दोन ते तीन किमी धावल्याची माहिती प्रवाशांनी दिली. यानंतर काही नागरिकांनी हे चाक बारामती एसटीत पाठवून दिले. त्यानंतर एसटीला चाक बसवण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र नट नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. जीव वाचल्याचा प्रवाशांना आनंद झाला, मात्र भररस्त्यात थांबून मनस्ताप सहन करावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button