breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

धार्मिक संस्थांची केरळला मदत

मुंबई – नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानतर्फे केरळ पुरग्रस्तांसाठी पाच लाखांची आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

केरळ पुरग्रस्तांना राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला राज्यातील जनता व विविध सामाजिक संस्था, मंदिर संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करीत आहेत. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, संस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी, सचिव गुंडू पुजारी, विश्वस्त अवधूत पुजारी, आशिष पुजारी, प्रशांत कोडणीकर उपस्थित होते.

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेडतर्फे 20 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग, चहल सिंग, प्रेमज्योतसिंग चहल, अमरीक सिंग वासरीकर, शेरसिंग फौजी, गुरूंदर सिंग बावा, एकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते

घाटकोपर मधील हिराचंद जयचंद दोशी हिंदू सभा हॉस्पिटलच्यावतीने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश हॉस्पिटॅलचे संचालक डॉ. वैभव देवगिरकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button