breaking-newsराष्ट्रिय

धर्म रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

परशुराम वाघमारे याची कबुली : बेळगावात घेतली होती ट्रेनिंग 
बंगळुरु – धर्माचे रक्षण करण्यासाठी आपण पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुराम वाघमारे याने दिली, असा दावा कर्नाटक एसआयटीने केला आहे. विशेष म्हणजे, गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी आपण बेळगावात ट्रेनिंग घेतल्याची कबुलीही परशुरामने दिली. त्यासाठी एअरगनचा वापर करण्यात आला.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी परशुराम वाघमारे याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. परशुराम वाघमारेची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीत त्याने गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा कबुलीजबाब दिला. मे 2017 मध्ये मला सांगण्यात आले की धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे. मी देखील त्यासाठी तयार झालो. मात्र, आता मला असे वाटते की मी एका महिलेची हत्या करायला नको होती, असे परशुरामने पोलिसांना सांगितले.

गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी परशुरामला नेमक्‍या कुठल्या संघटनेने किंवा संस्थेने ही कामगिरी सोपवली? त्यामागे कुणाचा हात आहे? याबाबत कुठलीही माहिती अद्याप एसआयटीने दिलेली नाही.दुसरीकडे, बंगळुरुत 5 सप्टेंबरला 2017 ला गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी त्याला तीन जणांनी मदत केली. या तीन जणांचा एसआयटी शोध घेते आहे. मात्र त्यांची नावे अद्याप उघड केलेली नाहीत. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी परशुरामला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली होती.

कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचे गूढ उलगडणार? 
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचे गूढ उकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचे फॉरेन्सिक चाचणीतून स्पष्ट झाले आहे. मात्र तिघांच्या हत्येसाठी जी बंदुक वापरली होती ती अद्याप सापडलेली नसल्याचे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदुक सापडली नसली तरी शरिरात घुसलेल्या गोळीवरुन कुठली बंदुक वापरण्यात आली या निष्कर्षापर्यंत पोहोचता येत असल्याचे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button