breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘धरण उशाला अन्ं कोरड घशाला’ ; पिंपरी-चिंचवडकरांना लवकरच दिवसाआड पाणी पुरवठा

पाणी कपात करण्यास महापाैरांचा आयुक्तांना ग्रीन सिग्नल

पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव तयार, गटनेत्यांचा बैठकीत होणार निर्णय़ 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणा-या धरण शंभर टक्के भरले आहे. तसेच उन्हाळ्याचे दिवस अजून सुरुच व्हायचे असताना पिंपरी चिंचवडकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी तयार केला असून सत्ताधारी पदाधिकारी आणि विरोधी गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे धरण उशाला अन्ं कोरड घशाला अशी परस्थिती शहरातील नागरिकांवर आली आहे. 

पाणी टंचाईचे पडसाद आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.  कमी दाबाने व अपु-या, विस्कळीत पाणी पुरवठ्यावरुन स्थायी सदस्यांनी पाणी पुरवठा अधिका-यांना धारेवर धरले. याविषयी विलास मडेगिरी म्हणाले की, इंद्रायणी परिसरात आठ दिवस झाले पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. अजून उन्हाळा सुरु व्हायचा आहे. तोपर्यंतच नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. याविषयी प्रशासनाने तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशा सुचना त्यांनी केल्या.

राजू मिसाळ म्हणाले, ‘प्राधिकरणात विस्कळीत सुरु आहे. सध्यस्थिती पाणी मुबलक असल्याने पाणी कपातीला आमचा विरोध आहे. पाण्यावरुन आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. त्यामुळे सर्व भागात समान पाणीपुरवठा करावा.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘ शहराच्या काही भागात जादा तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. समान पाणीपुरवठा करण्यासाठी आठ दिवसातून शहरातील एका भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात यावा किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास समान पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल’.

 

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटसरीने वापर करायला हवा. जलसंपदा विभागाने त्याबाबत पालिकेला पत्र दिले आहे. शहरात उच्च दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कपात करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुक्तांनी प्रस्ताव तयार केला असून गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेवून त्यांनी दोन दिवसात अमंलबजावणी करण्यात येईल. असे महापाैर राहूल जाधव यांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button