breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मेगाभरती रद्द करा ; गोपीचंद पडळकर

पुणे –  भाजप सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमाती (एसटी) च्या आरक्षणाची अमलबजावणी करावी. तसेच जोपर्यंत धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारने मेगाभरती रद्द करावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. यावेळी उत्तम जाणकर उपस्थित होते. 

पडळकर म्हणाले, ‘‘धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतेही सर्वेक्षण, संशोधन करण्याची आवश्यकता नाही. देशाच्या राज्यघटनेत धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण दिले आहे. मात्र, आजपर्यंत धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत आतापर्यंतच्या सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. कॉग्रेस राष्ट्रवादी प्रमाणेच भाजपही धनगर समाजाची फसवणूक करत आहे. मात्र, समाजातील प्रत्येक घटक जागा झाला आहे. त्यामुळे काँग्रेस -राष्ट्रवादीला ज्याप्रमाणे सत्तेतून हटवले त्याप्रमाणे येणार्‍या निवडणुकीत भाजपलाही हद्दपार केल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही, असेही पडळकर यावेळी म्हणाले.

‘‘सरकार आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही. त्यामुळे समाजात सरकार विरोधात तीव्र भावना आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी. अन्यथा गंभीर परीणामाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला. राज्यभरात धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा याअंतर्गत तालुकास्तरावर मेळावे घेण्यात येत आहेत. ज्या -ज्या ठिकाणी भाजपचे आमदार खासदार निवडून आले आहेत, त्याठिकाणी जाऊन भाजपला मतदान न करण्याबाबत समाजाची जागृती करत आहोत. त्यामुळे राज्य सरकराने मध्यप्रदेश सरकारने गोंड गोवारी समाजाला ज्याप्रमाणे परिपत्रक काढत आरक्षण दिले त्याप्रमाणे धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण परिपत्रक काढून लागू करावे, अशी मागणीही पडळकर यांनी यावेळी केली.

सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार
धनगर समाजाची सरकार फसवणूक करत असून त्याविरोधात राज्यभरात धनगर समाज सरकारच्या निषेधार्त बुधवार पासून घरावर काळे झेंडे लावत सरकारचा निषेध करणार आहे. राज्यातील धनगर समाजाने १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत एक सप्ताह घरावर काळे झेंडे, गुडी लावून सरकारचा निषेध करावा, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button