breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक ! केरळच्या चर्चमध्ये सेक्स स्कँडल

कोट्टायम:  केरळच्या कोट्टायम येथील चर्चमधील सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पाच पाद्रींना निलंबित करण्यात आले आहे. चर्चमधील या सेक्स स्कँडलमुळे संपूर्ण केरळ हादरून गेलं आहे.

मलंकरा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चने या पाच पाद्रींना निलंबित केलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तासमोर पापक्षालनासाठी आल्यावर या पाद्रींनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या महिलेने पापक्षालनासाठी प्रभू समोर दिलेल्या कबुलीचा या पाद्रींनी तिला ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येईल, असे चर्चचे जनसंपर्क अधिकारी पी. सी. इलियास यांनी सांगितले. सोशल मीडियातून अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यात काही तक्रारीही आहेत, आम्ही केवळ चौकशी अहवालाची वाट पाहतोय, त्यानंतरच कारवाई करू, असेही इलियास यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निरानाम धर्म प्रांताच्या अध्यक्षांकडे ७ मे रोजीच या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र चर्च या आरोपींवर कारवाई करण्यात चालढकल करत असल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे. तर दोषींविरोधात आपल्याकडे सज्जड पुरावे असल्याचा दावा या महिलेने केला आहे. लैंगिक अत्याचार करणारे तीन पाद्री निरानाम धर्म प्रांताचे असून एक पाद्री दिल्लीतील आहे. तर पाचवा पाद्री थुमपामोन धर्म प्रांताचा असल्याचे या महिलेने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button