breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दोनदा मतदान करण्याचे वक्तव्य; भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंविरोधात गुन्हा

नवी मुंबई – लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. अगोदर २३ एप्रिल रोजी साताऱ्यात मतदान करा, त्यानंतर २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, असा अजब सल्ला बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे. याविरोधात मंदा म्हात्रे यांच्यावर निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी रविवारी कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना मंदा म्हात्रे यांचा तोल गेला. मात्र, चूक लक्षात येताच दोन ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दिला होता, अशी पुष्टी जोडत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मंदा म्हात्रे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button