breaking-newsपुणे

दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव हवी : आमदार बच्चू कडू

पुणे – जनतेसाठी सर्व सामान्यासाठी काम केल्यानेच स्वत: च्या ताकदीवर बिना पैशात आमदार झालो. अपंग, दिव्यांग तसेच गोरगरीब सर्वसामान्याच्या साठी सोयीसुविधा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी काम केले, विविध प्रकारची ३७५ आंदोलन केली. दोन वेळा तुरुंगातही जावे लागले. पण त्याची काही फिकीर नाही. माझ्याकडे फक्त सहा जरी आमदार असतील तर स्वच्छ व गतिमान प्रशासन करून दाखवीन तसेच सर्वप्रथम दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव असणे गरजेचे असल्याचे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

ते काल शिवनेरी फाऊंडेशनचे संदीप मोहिते यांनी आयोजित संवाद व्यासपीठावरते सहकारनगर येथे ते बोलत होते. या कार्यक्रमाला विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मंदिरात जाणारी गर्दी रुग्णालयात जाईल तेव्हा खरं समाजकाम सुरू होईल. नवदुर्गा उत्सवात विधवांना दत्तक घेवून उत्सव साजरा करा, १९५२ पासून धरणे बांधण्यात आली मात्र, योग्य पद्धतीने पुनर्वसन झाले नाही. यातील अडीच लाख प्रकल्पग्रस्त अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सध्याचा भूसंपादन कायदा चांगला असून योग्य मोबदला मिळत आहे. सध्या योग्य पद्धतीने काम न करता याचा कायदा शिकवणारेच कायदा जास्त मोडतात. यावेळी स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर निर्मिती करणारे तसेच भविष्यात हवेत उडणारी कार व ड्रोन ची निर्मितीसाठी प्रयत्न करणारे प्रदीप मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button