breaking-newsआंतरराष्टीयक्रिडा

दुबई मास्टर्स कबड्डी 2018 : भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय

दुबई – बलाढ्य आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने कबड्डी मास्टर्स अजिंक्‍यपद स्पर्धेत दणदणीत सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 36-20 असा धुव्वा उडवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना पाकिस्तानला सहजपणे लोळवले. दुबईत पार पडत असलेल्या 6 निमंत्रीत देशांच्या कबड्‌डी स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात येणाऱ्या भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 36-20 अशी मात केली. भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दुबईत या स्पर्धेच्या चषकाचं अनावरण केलं.

भारताकडून कर्णधार अजय ठाकूरने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या सत्रापासून अजय, प्रदीप नरवाल यांनी आक्रमक चढाया करत पाकिस्तानच्या बचावफळीला खिंडार पाडलं. मधल्या काही मिनीटांमध्ये पाकिस्तानने भारताचा चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बचावफळीच्या भक्कम बचावापुढे पाकिस्तानची डाळ शिजू शकली नाही. या खेळीच्या जोरावर भारताने मध्यांतरीला 21-8 अशी भक्कम आघाडी घेतली.
दुसऱ्या सत्रातही भारताने खेळाला आक्रमक सुरुवात केली. या सत्रातही पाकिस्तानला सर्वबाद करण्यात भारताचा संघ यशस्वी ठरला. अखेर 36-20 या फरकाने पाकिस्तानवर मात करत स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना शनिवारी केनियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. कर्णधार ठाकूरच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारतीयांनी पाकिस्तानचा फडशा पाडला. ठाकूरने चढाईमध्ये 15 गुणांची लयलूट केली, तसेच बचावामध्ये त्याने भक्कम पकड करताना पाकिस्तानची कोंडी केली. ठाकूर एकटा पाकिस्तान संघासाठी कर्दनकाळ ठरला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button