breaking-newsपुणेमहाराष्ट्र

दुधी भोपळ्याचा रस पिल्याने महिलेचा मृत्यू?

पुणे   – दुधी भोपळा शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी समजला जातो. मात्र, पुण्यातील 41 वर्षीय महिलेचा दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना 16 जून रोज बाणेर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये घडली. अशा प्रकारे मृत्यू होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र, या घटनेनंतर दुधी भोपळ्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते आहे.
पुण्यातील उच्चशिक्षित गौरी शहा (वय 41, रा. बाणेर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला एरंडवण्यातील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत डाटा सायंटिस्ट म्हणून काम करत होती. संबंधित महिलेने 12 जून रोजी सकाळी व्यायाम करून आल्यावर एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस घेतला. त्यानंतर अर्ध्या तासांत त्यांना उलट्या, जुलाब, श्‍वासोच्छवासाला त्रास आणि पोटात दुखू लागले. त्यानंतर दुपारी त्यांना बाणेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत होती. मात्र, त्यानंतर मेंदुमध्ये गाठ असल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर शत्रक्रिया करण्यात आली. शत्रक्रियेनंतर परत त्यांच्या मेंदुत गाठ झाल्याने दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शेवटी 16 जून रोजी तिचा मृत्यू झाल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली.
दरम्यान, याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्‍त शिवाजी देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, भोपळ्याच्या रसाबाबत आमच्याकडे संशोधन होत नाही. आम्ही कारवाईचे काम करतो. जर भोपळ्याचा रस विकणाऱ्यांच्या गुणवत्तेबाबत आक्षेप असेल तर नक्‍कीच अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button