breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दीड दिवसाच्या गणरायाचे भावपुर्ण विर्सजन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोष करीत शहरात आज (शुक्रवारी) दीड दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप दिला. बालगोपाळांसह नागरिकांनी मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरण घरोघरच्या गणरायाला निरोप दिला.

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी वाजत-गाजत आनंदी, उत्साहात गणरायाचे आगमन झाले. दीड दिवसाच्या पाहुणचारानतर अनेक घरगुती गणपतीचे ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे निमंत्रण देत जड अंतकरणाने विसर्जन  करण्यात आले. बाप्पा दीड दिवसासाठी आले असले, तरी त्यांची मनोभावे सेवा भाविकांनी केली. नंतर विधीवत पूजा करून  शुक्रवारी विसर्जित केले.

दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.  श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून विसर्जन घाटावर विसर्जन केले. शहरात नदीपात्रात, भोसरीत विहीरीत, निगडीत गणेश तलावात आणि अनेक ठिकाणी कुत्रिम हौदात या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनस्थळी निर्माल्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली होती. दुपारनंतर सुरु झालेले विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button