breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दि. सेवा विकास को. ऑप बँकेनेच घातला सभासद, ठेविदारांना गंडा, पोलीस आयुक्तांना निवेदन

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरामध्ये नामांकित असलेल्या दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. मध्ये संचालक मंडळाने कोट्यवधींचा अपहार केला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने विनातारण कर्ज देताना मर्यादेचे उल्‍लंघन केले आहे. एक कोटी किंवा त्यावरील कॅश क्रेडिट कर्जासंदर्भातही बँकेने आवश्यक खबरदारी घेतली नाही. अनेक सभासदांनी कर्ज मंजुरी, विनियोग, कर्ज तारण यासंदर्भात सहकार विभागाकडेही तक्रारी केलेल्या आहेत. यामध्ये तथ्य असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालात दिसून आले आहे. खातेदार, सभासद, ठेवीदारांच्या पैशावर डल्‍ला मारणा-या सेवा विकास बँकेच्या संचालक मंडळावर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्याकडून बँके खातेदार, सभासदांच्या पैशांचा हिशोब घेऊन तो वसूल करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांच्याकडे केली आहे.

याबाबत तक्रारदार कुमार पहेलजराय मेंघाणी, प्रकाश आसवानी, सुरेश जोधवानी, बन्सी धनानी, नितीन रोहरा यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रारी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सिंधी समाज बांधवांच्या हितासाठी दि सेवा विकास को- ऑ. बँकेची स्थापना झाली. दि. सेवा विकास को-ऑप. बँक लि. मध्ये आमचे बचत व चालु खाते आहेत. बँकेचे आम्ही भागधारक आहोत. २०१० ते २०१९ या कालावधीत दि सेवा विकास को- ऑप बँक लि या बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्ज विभाग प्रमुख, संबंधित शाखा प्रमुख यांनी संगनमत करून बँकेचे खातेदार, ठेवीदार व सभासदांच्या ठेवींचा गैरवापर सुरू केला. चुकीच्या पद्धतीने निदर्शनास आलेले १०४ खातेदार व इतर यांना कर्ज वाटप केलेले आहे. याबाबत बँकेचे लेखा परिक्षण करून व गुन्हा दाखल करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे अर्ज करण्यात आले आहे. त्याबद्दल सभासदांनी बॅंकेचे चेअरमन, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्ज विभाग प्रमुख, शाखा व्यवस्थापक यांच्या विरोधात पोलिसांतही यापूर्वी तक्रारी अर्ज दिले आहेत.

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था सतिश सोनी यांनी कार्यालयीन बँकेची चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परिक्षण सहनिबंधक आर. यु. जाधवर यांची नियुक्ती केली. दोन महिन्यात चाचणी लेखा परिक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहवालानुसार बँकेच्या उपरोक्त अपहाराविषयचा अहवालाची संपूर्ण माहिती, जनमाहिती अधिकारी लेखापरिक्षण विभाग साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयातून माहिती अधिकाराअंतर्गत हा अपहार उघडकीस आला आहे. सेवा विकास को ऑप बँक लि. यांनी बँकेच्या वेगवेगळ्या शाखेतून बेहिशोबी कर्जवाटप केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून कोट्यवधी खातेदार, सभासद, ठेवीदारांच्या पैशावर डल्‍ला मारणा-या सेवा विकास बँकेच्या दोषी संचालक मंडळावर कडक कारवाई करावी. जेणेकरून त्यांच्याकडून बँके खातेदार, सभासदांच्या पै-पैचा हिशोब घेऊन त्याची वसुली होऊन बँक आर्थिक अडचणीतून बाहेर येईल. त्यामुळे खातेदारांचा बँकेवर आणखी विश्वास दृढ होईल, असे तक्रारदार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती हिरानंद आसवानी आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button