breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघीतील बेकायदेशीर हातगाड्या आणि टप-यांवर महापालिकेची कारवाई

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क व ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दिघीतील ममता चौकात विनापरवाना थाटलेल्या हातगाड्या आणि टप-यांवर कारवाई करण्यात आली. दोन पत्राशेडही जमिनदोस्त करण्यात आले.

अनधिकृत टप-या आणि हातगाड्यांचे पेव दिवसेंदिवस वाढू लागल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दिवाळीनंतर कारवाईला सुरूवात केली आहे. बुधवारी (दि. 13) महापालिकेच्या क आणि इ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील दिघीच्या ममता चौकात मोठी कारवाई करण्यात आली.

या कारवाईत 3 हातगाड्या, 7 टप-या, 3 लोखंडी ग्रील, 3 लोखंडी काऊंटर, 3 लोखंडी खाटा, 1 लोखंडी पथारी फ्रुट रेस्ट, 25 प्लास्टीक क्रेट, 57 बांबू, 10 लोखंडी जाहिरात फलक, 10 लाकडी वासे, 5 प्लास्टिक स्टूल, 1 मोठी छत्री, 5 टप-या जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन पत्राशेड देखील निष्काशीत करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button