breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या “पिस्तुलधारी” नगरसेवकाची वारीत “घुसखोरी”

  • पालखी सोहळ्यातील वारकरी भयभीत
  • पोलीस आणि नगरसेवकांमध्ये शाब्दीक बाचाबाची

 

पिंपरी – आकुर्डीतील मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज शनिवारी (दि. 7) पंढरीकडे प्रस्थान ठेवले. हा पालखी सोहळा दापोडीतून दरमजल करीत मार्गस्त होत असताना महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाजपचा एक पिस्तुलधारी नगरसेवक चक्क वारीत घुसला. त्यामुळे वारक-यांमध्ये भयभीत वातावरण झाल्याची चाहूल लागताच पोलिसांनी या पिस्तुलधारी नगरसेवकाला तातडीने बाजुला सारले. दरम्यान, पोलीस आणि नगरसेवक यांच्यात चांगलीच झटापट झाली. मात्र, तुकोबांच्या पुण्याईने वारीतील अनर्थ क्षणात टळला.

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्याने सर्वत्र पवित्र वातावरण आहे. वारीत राज्याच्या कानाकोप-यातून लाखो वारक-यांच्या दिंड्या सहभागी झाल्या आहेत. हा विलोभनिय सोहळा शनिवारी दुपारी दिमाखात मार्गस्त होत असताना पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वारक-यांच्या सुरक्षितेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वारीच्या सुरक्षेची काळजी पोलीस कटाक्षाने घेत होते. त्याचवेळी नियम धाब्यावर बसवून शहरातील भाजपचा उच्चशिक्षीत पिस्तुलधारी नगरसेवक दापोडी येथे वारीत घुसला. पादुकांचे दर्शन घेत असताना नगरसेवकाने आपल्या जवळील पिस्तुल सहका-याच्या स्वाधीन केले होते.

मात्र, नगरसेवकाचा सहकारी हातात पिस्तुल घेऊन खुलेआम रथाभोवती फिरत होता. त्याच्या हातातील पिस्तुल पाहताच वारकरी देखील भयभीत झाले. चांगलीच कुजबूज सुरू झाल्याने दक्ष पोलिसांना तातडीने हातात पिस्तुल घेऊन फिरणा-या नगरसेवकाच्या साथिदाराला ताब्यात घेतले. त्याच्या हातातील पिस्तुल जप्त करण्यात आले. हे कळताच भाजपचा नगरसेवक शिताफीने पुढे सरसावला. दरम्यान, पोलीस आणि नगरसेवक यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. वातावरण चांगलेच चिघळण्याच्या मार्गावर होते. तेवढ्यात पिस्तुल बाळगण्याचा परवाना दाखविताच नगरसेवक आणि पोलिसांमधील बाचाबाची थंडावली. यावेळी जप्त केलेले पिस्तुल वरीष्टांकडून घेऊन जाण्याची सूचना पोलिसांनी नगरसेवकाला केली होती. शेवटी वरीष्ठ स्तरावरून सुत्रे हलल्याने कनिष्ठ पोलिसांना हे पिस्तुल परत करणे भाग पडले.

जर सहका-यानेच हे शस्त्र रोखल्यास…
पिस्तुल बाळगण्याचा परवाना असला तरी संबंधित नगरसेवक अथवा राजकीय पुढारी आपल्याजवळील पिस्तुल काही कारणास्तव सहका-याच्या स्वाधीन करतात. परंतु, या सहका-यानेच जर हे पिस्तुल कोणावर रोखल्यास सुरक्षेची हमी कोण देणार?, सध्या खासदार, आमदारांसह नगरसेवकांमध्ये स्वतःच्या सुरक्षेपोटी पिस्तुल बाळगण्याचे फॅड पिंपरी-चिंचवडमध्ये चांगलेच गाजत आहे. संबंधित नगरसेवकाने हे शस्त्र तात्पुरत्या वेळेसाठी रितसर पोलिसांच्या स्वाधीन केले असते, तरी ते कायद्याचा सन्मान करणारे ठरले असते. मात्र, या उच्चशिक्षीत नगरसेवकाला तसे करावे, असे जरा सुध्दा वाटले नाही. हा नगरसेवक जुनी सांगवी येथील असल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button