breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दळवीनगरच्या मनपा शाळेत तरुणांचा धुडगुस, खिडक्यांची तोडफोड; विद्यार्थी भयभीत

  • उर्मट समाजकंटकांनी केली मुख्याध्यापिकेला शिवीगाळ 
  • चिंचवड पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगारीला मिळाले प्रोत्साहन  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवडच्या दळवीनगर येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत स्थानिक तरुणांच्या टोळक्याने बुधवारी (दि.28) दुपारी अडीचच्या सुमारास अचानक धुडगूस घातला. शाळा सुरु असताना काही तरुणांनी खिडक्यांना दगड मारुन काचा फोडल्या. तसेच शाळेत प्रवेश करीत मुख्याध्यापिकांना देखील शिवीगाळ केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भिती वातावरण पसरले असून स्थानिक पोलिस अधिका-यांचे या घटनेकडे दुर्लक्ष झाले आहे.

दळवीनगर येथे महापालिकेची महात्मा फुले प्राथमिक शाळा भरत आहे. त्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून साधारणता दोनशे ते अडीचशे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत. पुर्वी चिंचवडच्या प्रेमलोक पार्कमध्ये महापालिकेची महात्मा फुले प्राथमिक शाळा भरत होती. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील पोलिस आयुक्तालय कार्यालयासाठी ही शाळा तेथून दळवीनगरमध्ये नवीन इमारतीत स्थलातंरित करण्यात आली. परंतू, शाळा स्थलातंरित करण्यासाठी पालकांनी विरोध दर्शविला होता. तरीही महापालिका प्रशासनाने पालकांचा विरोध डावलून ही शाळा स्थलांतरित केली होती.

दरम्यान, दळवीनगरला महापालिकेच्या नविन इमारतीत 15 जूनपासून शाळा सुरु झाली. शाळा सुरु झाल्यानंतर तेथील काही स्थानिक तरुण पाचवी-सहावीच्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होवू लागले होते. शाळा सुटल्यानंतर सुरक्षारक्षकांस दमदाटी करुन इमारतीत दारु पिण्यास बसणे, जुगार खेळणे असेही प्रकार वाढले होते. परंतू, बुधवारी  दुपारच्या सुमारास अचानक प्राथमिक शाळेत तरुणांनी प्रवेश केला. तेथील मुख्याध्यापिकेला शिवीगाळ करुन दमदाटी केली. शाळेच्या खिडक्यांना दगड मारुन काचाही फोडण्यात आल्या. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दहशत माजविण्यासाठी शहरातील वाहनांची तोडफोड करताना हे लोण आता प्राथमिक शाळांना टार्गेट करु लागले आहेत. स्थानिक तरुणांना पोलिसांनी वेळीच आवर न घातल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही मुश्किल होणार आहे. त्यामुळे या घटनेकडे चिंचवड पोलिस अधिका-यांनी लक्ष देवून कारवाईची मागणी पालकांतून होताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button