breaking-newsआंतरराष्टीय

दक्षिण सीरियात पुन्हा हवाई हल्ले

बैरूत – दक्षिण सीरियात सरकारकडून पुन्हा हवाई हल्ले करण्यात आल्याचे वृत्त आहे. गनिमांच्या ताब्यातील मालमत्ता नष्ट करण्याच्या उद्देशाने हे हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी काल झालेल्या या हल्ल्यात दोन हॉस्पीटलचे मोठे नुकसान झाले असून किमान पाच सामान्य नागरीक यात ठार झाले आहेत.

सीरियन सरकारच्या विरोधातील बंडखोरांना शरण आणण्यासाठी तेथे जमीनीवरूनही लष्करी कारवाई केली जात असली तरी अजून त्याला म्हणावे तसे यश येत नसल्याने हवाईमार्गाने त्यांच्यावरील हल्ले पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. अशा हल्ल्यांमध्ये निरपराध नागरीकांची मोठी जीवित हानी होत असल्याने या कारवाईला संयुक्तराष्ट्रांनी मोठा आक्षेप घेतला आहे.

सीरियन सरकारला रशियन लष्कराचे सहाय्य आहे. त्यामुळे रशियाच्या सहाय्यानेच हे हवाई हल्ले केले जात आहेत. काल रविवारी रशियन हवाईदलाने अलहेराक, अल सुरा, अलमा या गावांवर हवाई हल्ले केले त्यात नागरी मालमत्तांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ही तिन्ही गावे बंडखोरांच्या ताब्यात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button