breaking-newsराष्ट्रिय
‘त्या’ महिला अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक
नवी दिल्ली: अवैध बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक महिला नगरविकास अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केलेल्या हॉटेल मालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली क्राईम ब्रांचच्या मदतीने हिमाचल पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक विजय कुमारला अटक केली. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
शैलबाला शर्मा या महिला अधिकारी विजय कुमारच्या अवैध हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी विजय कुमारने त्यांच्यावर गोळीबार करुन हत्या केली होती. हिमाचल पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील मथुरा येथे अटक केली.