breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘तु माझी नाही झालीस, तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही’

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मोबाईलद्वारे अश्लिल संदेश पाठवून तरुणीचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तु माझ्यासोबत लग्न कर. तु माझी नाही झालीस, तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देखील तरुणीला दिली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) रहाटणी येथील गणपती मंदिराजवळ शिवराजनगर येथे घडली.

याप्रकरणी स्वप्निल अजित साळवी (वय 27, रा. शिवराजनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या अरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल आणि पीडित तरुणी यांची ओळख असल्याने त्याने मोबाईलद्वारे तरुणीला अश्लिल संदेश पाठविला. त्यामुळे तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने हा वादाचा विषय बनला. तु माझ्यासोबत लग्न कर नाही तर, मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन तरुणीला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button