breaking-newsराष्ट्रिय
‘ती’ तरुणी म्हणाली, मेजर गोगोई हे माझे मित्र, स्वेच्छेने त्यांच्यासोबत गेले
नवी दिल्ली : वादात सापडलेले मेजर लितूल गोगोई यांना दिलासा मिळाला आहे. ज्या तरुणीसोबत गोगोई हॉटेलमध्ये गेले त्या तरुणीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब दिला आहे. ‘मेजर गोगोई हे माझे फेसबुक फ्रेंड असून स्वत:च्या मर्जीनेच मी त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये गेले होते. आम्हाला काही वेळ एकत्र घालवायचा होता’, असे त्या तरुणीने सांगितले.
मेजर गोगोई हे एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले. तरुणीसोबत गेल्याने हॉटेल कर्मचाऱ्याने त्या दोघांना प्रवेश नाकरला. तेव्हा वाद होऊन हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले होते. चौकशीनंतर गोगोईंची सुटका झाली. पण लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.