breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं, दिग्गजांचं भवितव्य EVM मध्ये बंद

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठी 117 मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडलं. यामध्ये राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.01 टक्के मतदान झालं, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

14 लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 52.28 टक्के, रावेर 56.98 टक्के, जालना 59.92 टक्के, औरंगाबाद 58.52 टक्के, रायगड 56.14 टक्के, पुणे 43.63 टक्के, बारामती 55.84 टक्के, अहमदनगर 57.75 टक्के, माढा 56.41 टक्के, सांगली 59.39 टक्के, सातारा 55.40 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 57.63 टक्के, कोल्हापूर 65.70 टक्के, हातकणंगले 64.79 टक्के.

उन्हाच्या कडाक्यामुळे भर दुपारी मतदानाला थोडा थंड प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं. मात्र, पुन्हा संध्याकाळी मतदारांचा उत्साह दिसून आला. तिसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गजांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सहकुटुंब मतदान केलं. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर जळगावमध्ये गुलाबराव देवकर, जालनामध्ये रावसाहेब दानवे, शिर्डीमध्ये सुजय विखे-पाटील आणि औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांनीही मतदान केलं.उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झाल्यानं सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे.23 मे रोजी लोकसभेचा निकाल लागणार असल्यानं देशभराच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button