breaking-newsमनोरंजन

तिन्ही खानांपैकी शाहरुख सर्वात फेव्हरेट- माधुरी

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडमधील आमिर, सलमान आणि शाहरुख या तिन्ही खानांबरोबर सिनेमे केले आहेत. तिने यांच्याबरोबर केलेले सिनेमे सुपरहिट देखील झाले आहेत. पण या तिघांपैकी शाहरुख खान आपला सर्वात फेव्हरेट कलाकार आहे, असे माधुरीने सांगितले आहे. अलिकडेच मराठीतील “बकेट लीस्ट’ या पदार्पणाच्या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान माधुरीला या तिघांपैकी सर्वात फेव्हरेट खान कोणता असे विचारले गेले होते. तेंव्हा आमिरबरोबर आपण दोन सिनेमे केले आहेत. तो एक लव्हली स्टार आहे.

सलमानही खूप चांगला आहे. मात्र त्यापेक्षा शाहरुख खानबरोबर आपले ट्युनिंग खूप चांगले जुळते, असे माधुरीने सांगितले. माधुरीच्या मते शाहरुखचा “सेन्स ऑफ ह्युमर’ खूपच चांगला आहे. तो एक जंटलमन आहे आणि बरोबर काम करणाऱ्या हिरोईनची खूप काळजीही घेतो. शाहरुख खानबरोबर काम करायला बहुतेक हिरोईन जास्त उत्सुक असतात, याचे कारण नेमके हेच असावे.

शाहरुख आणि माधुरीने कोयला, गजगामिनी, देवदास, हम तुम्हारे है सनम, दिल तो पागल है, अंजाम आदी सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. यातील अंजाममध्ये शाहरुख माधुरीला छळणारा खलनायक होता. मात्र इतर सिनेमांमधील त्यांची जोडी हिट झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button