breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तासगावमध्ये भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सोमवारी रात्री हिंसाचाराचे गालबोट लागले. नगरसेवकाला मारहाण झाल्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँगेसचे कार्यकर्ते आमने सामने आले असून दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत.

तासगाव येथे पोटनिवडणूक होणार असून या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारी रात्री खासदार संजयकाका पाटील यांचे निकटवर्तीय आणि स्वीकृत नगरसेवक बाबासाहेब पाटील यांना धक्काबुक्की झाली. हे वृत्त समजताच भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष करण पवार आणि स्थानिक नेते तानाजी पवार यांच्या घरावर दगडफेक केली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हाणामारी झाली. या सर्व प्रकारात घटनास्थळी गेलेले तीन पोलिसही जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button