breaking-newsताज्या घडामोडीपुणे

तालेरानगरमध्ये नागरिकांच्या घरावर दगडफेक

पिंपरी : रात्री अचानक दगड पडत असल्याने चिंचवडमधील नागरिक हैराण झाले. घरांवर व परिसरात कोणीतरी दगड फेकत करीत आहे, त्यामुळे दगडफेक करणा-याचा शोध घेण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागे रहावे लागत आहे. दरम्यान दगडफेकीमुळे नागरिकांच्या अनेक घरांचे पत्रे फुटले असून, या घटनेत तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकाराचा छडा लावून हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चिंचवडच्या तालेरानगर, भीमनगर भागात गेल्या २५ दिवसांपासून घरांवर दगड टाकले जात आहेत. रात्री घडणा-या या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आल्यानंतर पोलिसांसमोरही दगड पडले आहेत. तरीही याचा
तपास करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होवू लागल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या भागात काही बैठी घरे, तर काही मोठ्या इमारती आहेत. कोणत्याही क्षणी या भागात दगड फेकले जात असल्याने येथील नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या घटनेत काही घरांचे पत्रे फुटले असून, एका व्यक्तीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत. दगड फेकणा-यांचा शोध घेण्यासाठी कार्यकर्ते रात्रभर परिसरात गस्त घालत आहेत. मात्र दगड कोठून येतात याचा अंदाज येत नसल्याने अडचणी येत आहेत. अनेक घरांच्या छतावर दगडांचा खच पडला आहे. घराबाहेर खेळणारी मुले या घटनेत जखमी झाली आहेत. दगडफेकीने परिसरात दहशत पसरली असून नागरिक भयभयीत झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button