breaking-newsआंतरराष्टीय

तालिबानने फेटाळला चर्चेचा दावा

काबुल – तालिबानबरोबर काबुल सरकारची बोलणी सुरू असल्याचा दावा अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधील लष्कराच्या कमांडरने केला होता. तथापी हा दावा तालिबानने फेटाळला आहे. आमची कोणाबरोबरही कोठेही चर्चा सुरू नाहीं असे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकेचे लष्करी कमांडर जॉन निकलोसन यांनी पेंटागॉन येथे पत्रकारांशी बोलताना केले निवेदन निखालस खोटे आहे असे तालिबानचे प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.

जनरल निकोलसन यांनी म्हटले होते तालिबानचे वरीष्ठ तसेच मध्यम पातळीवरील नेते सध्या अफगाण सरकार बरोबर चर्चा करीत आहेत. या प्रक्रियेत काही आंतरराष्ट्रीय संस्था आणि काही देशांची विदेश मंत्रालय पातळीवरील मंडळीही यात सहभागी झाली आहेत असे त्यांनी म्हटले होते. अमेरिकेचे अफगाण विषयक धोरण पुर्ण फसल्याने त्यांनी त्यांचे अपयश झाकण्यासाठी हा बोगद दावा केला आहे असे तालिबानच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button