breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तापकीर शाळेच्या वतीने ‘शिवजन्मोत्सव’ थाटात साजरा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाची सूरूवात करण्यात आली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा प्रवास गाण्यांच्या माध्यमातून साकारला. प्रितम शेळके, श्रेयश कागदे या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.

तसेच शुभम बाळू पन्हाळे, रितेश चौधरी, अस्मिता अवचार, विनायानी लोहार, पायल कांबळे या विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करून स्फूर्तीदायी वातावरण तयार केले. भूषण कुमार धुपे, अथर्व इप्परकर, प्रगती जाधव या विद्यार्थ्यांनी भाषणे करून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून उपस्थितांची वाहवा मिळविली. ओंकार जाधव आणि सहकारी यांनी खड्या आवाजात शिवाजी महाराजाची आरती सादर केली.

यावेळी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, छावा युवा मराठा महासंघचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, नाना फुगे, तिरोडा विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले, स्वीकृत नगरसेवक देविदास पाटील, सुरेश पाटील, संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अश्विनी तापकीर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, पुणे केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, आदी मान्यवर व पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भटकर यांनी केले. उपशिक्षिका उल्का जगदाळे यांनी आभार मानले. जम्मु काश्मीर पुलवामामध्ये आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button