breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

..तर गळक्या एसटीतून अधिकाऱ्यांनाच प्रवास

गळक्या छतांमुळे अंगावर पडणारे पाणी आणि त्यातूनच तासंतास होणारा एसटीचा प्रवास, पावसाळ्यात प्रवाशांना हा अनुभव काही नवीन नाही. मात्र आता एसटी गळकी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच एसटीतून फेरफटका मारला जाईल, अशी तंबी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी अधिकाऱ्यांना दिली.

यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एसटीच्या गळक्या बसगाडय़ांची दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश एप्रिल २०१९ मध्ये एसटी महामंडळाने काढले.  सोमवारी पुण्यात आषाढी एकादशीनिमित्त जादा बस गाडय़ांविषयी एसटीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी गळक्या एसटी गाडय़ांबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितला. एकही एसटी गळकी नसल्याचे अधिकाऱ्यांकडून बैठकीत सांगितले. मात्र राज्यातील काही भागांत रविवारी मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळी एसटीच्या बऱ्याच गाडय़ा या गळक्या असल्याचे निदर्शनास आले आणि त्याच्या तक्रारी रावते यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या रावते यांनी गळकी एसटी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच एसटीतून फेरफटका मारला जाईल, अशी तंबी दिली व त्वरीत एसटीच्या छतांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.

कार्यालयातील वीज तोडणीचे आदेश

बुलढाणा जिल्ह्य़ात जळगाव-जामोद या बस स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी इलेक्ट्रिक पंखे बसवण्यात आले आहेत. कित्येक दिवस ते नादुरुस्त असून त्याच्या तक्रारी करूनही उपाययोजना झाली नव्हती. नवीन पंखे बसवण्याबाबतचा प्रस्ताव एसटीच्या मुंबईतील भांडार व खरेदी विभागाकडे दोन महिन्यांपूर्वीपासूनच पडला होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाले आणि ही बाब दिवाकर रावते यांना समजताच त्यांनी सोमवारी भांडार व खरेदी कार्यालयातील वीज तोडणीचे आदेश दिले. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना पंखे, वातानुकूलित यंत्रणाशिवाय काम करावे लागले. चूक समजताच तातडीने या विभागाने प्रस्ताव मंजूर केला.

सोमवारी पुण्यात आषाढी एकादशीनिमित्त जादा बस गाडय़ांविषयी एसटीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी गळक्या एसटी गाडय़ांबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितला. एकही एसटी गळकी नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आषाढी एकादशीनिमित्त जादा बसगाडय़ा

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळ ३ हजार ७२४ जादा बसगाडय़ा सोडणार आहे. १० जुलै ते १६ जुलैपर्यंत एसटीचे पाच हजार चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पंढरपूर येथे कार्यरत राहतील.

पावसाळ्यात एसटी गाडय़ांच्या गळक्या छतांमुळे प्रवाशांच्या अंगावर पाणी पडते. यावेळी पावसाळ्यात तसे दिसल्यास अधिकाऱ्यांनाच घेऊन त्यातून फेरफटका मारला जाईल.

-दिवाकर रावते, परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button