breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तरुणाची दोन लाखांची फसवणूक

पिंपरी – पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी लावतो म्हणून 24 वर्षीय तरुणाची सुमारे 2 लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी क्रांतीकुमार सालीकांती (वय-24, रा. हुलावळे, हिंजवडी) याने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतीकुमार यांना पुणे येथील एका नामांकीत कंपनीमध्ये नोकरी लावतो असे सांगून फोनद्वारे व मेलद्वारे वारंवार पैसे मागून सुमारे 2 लाख 11 हजार 768 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 9 मार्च ते 14 मे 2018 या काळात करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एक अज्ञात महिला व पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button