breaking-newsपिंपरी / चिंचवड

त्या तरुणाचा खून करून फेकलेला मृतदेह आढळला

पिंपरी (महा ई न्यूज) – तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह फेकून दिला. घटनेनंतर काही दिवसांनी त्याचा मृतदेह भोसरी येथील वाळके मळ्याजवळ आढळून आला. हा प्रकार रविवारी (दि. 23) पहाटे उघडकीस आला.

मृतदेह आढळलेल्या तरुणाचे वय अंदाजे 25 वर्ष आहे. अंगात बर्मुडा घातलेला आहे. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी वार केल्याचे आढळून आले आहे. अद्याप तरुणाची ओळख पटलेली नाही. यावरून अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी अज्ञात आरोपींनी तरुणाचा खून केला. यामध्ये आरोपींची तरुणाच्या मानेवर, बरगडीवर, हातावर आणि डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. त्याचा मृतदेह भोसरी मधील वाळके मळ्याशेजारी असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खाली टाकून दिला. रविवारी भोसरी पोलिसांना हा मृतदेह सापडला. खून झालेल्या तरुणाची ओळख पटवून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button