breaking-newsमनोरंजनमुंबई

तनुश्री दत्ताची नानाविरोधात पोलिसांत तक्रार

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर शनिवारी (ता. 6) ओशिवरा पोलिसांत तक्रार केली. तक्रारीत नाना पाटेकर यांच्यासह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांचाही उल्लेख केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ओशिवरा पोलिस ठाण्यात तनुश्रीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलिस या प्रकरणाची पडताळणी करत आहेत. त्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचा पोलिस जबाब नोंदवणार आहेत. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. दत्ताच्या आरोपानंतर नाना पाटेकर यांनी आपल्या वकिलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी आपण आठ वर्षांपूर्वीच उत्तर दिले असून जे असत्य आहे, ते असत्य आहे, अशी प्रतिक्रिया नानाने व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button