breaking-newsराष्ट्रिय

तणावपुर्ण वातावरणात हास्याची लकेर…

नवी दिल्ली – कर्नाटकातील राजकीय पेच प्रसंगाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना तेथील जे तणावपुर्ण वातावरण होंते त्यात एका न्यायाधिशांनी व्हॉट्‌सअपवरील एक जोक ऐकवून वातावरण हलकेफुलके बनवले. त्यांनी सांगितले की कर्नाटकातील स्थितीबाबतचे अनेक व्हॉट्‌सअप जोक आमच्याही वाचनात आले आहेत.

आज जे 116 आमदार ज्या हॉटेलात ठेवले आहेत त्या हॉटेलचा मालकही आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू शकतो अशी एक व्हाटॅसअप कॉमेंट त्यांनी ऐकवली. भाजपच्या फोडाफोडीच्या शक्‍यतेने कॉंग्रेस व जेडीएसचे सगळे आमदार तीन बसेस मधून हैदराबादला एका पंचतारांकित हॉटेलात नेण्यात आले आहेत.

या आमदारांना चार्टर्ड विमानाने तिकडे नेले जाणार होते पण या विमानाला सरकारने अनुमती नाकारल्याने आमदारांना बस मधून नेण्याची वेळ आल्याचा दावा कॉंग्रेस कडून करण्यात आला.

कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव 
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करेपर्यंत कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे. प्रथेप्रमाणे विधानसभेत एक अँग्लो इंडियन व्यक्तीला आमदार म्हणून नेमण्याचा अधिकार नवीन सरकारला असतो. त्यालाही कोर्टाने मज्जाव केला आहे. बहुमत सिद्ध करेपर्यंत अशी नियुक्ती केली जाऊ नये असेही न्यायालयाने त्यांना बजावले आहे.

उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेची जी बैठक होईल त्याच्या सभापतीपदावरूनही मोठी घमासान अपेक्षित आहे. प्रथेप्रमाणे सर्वात ज्येष्ठ आमदाराला प्रोटेम स्पीकर म्हणून नेमण्याची प्रथा आहे. ही प्रथा मानली जाईल की नाही याचीही मोठी उत्सुकता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button